अडकूर येथील रवळनाथ गल्लीतील प्रलंबित रस्ता अखेर पुर्ण, ग्रामस्थांतून समाधान व्यक्त - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2023

अडकूर येथील रवळनाथ गल्लीतील प्रलंबित रस्ता अखेर पुर्ण, ग्रामस्थांतून समाधान व्यक्त

 


अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

       अडकूर (ता. चंदगड) येथील अनेक वर्षे प्रलंबित असलेला रस्त्याचा विषय अडकूर ग्रामपंचायतीने विविध फंडाच्या माध्यमातून निकाली काढला. त्यामुळे ग्रामस्थांतून ग्रामपंचायतीच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.  

          या गल्लीमध्ये गटार व रस्ता करावा. यासाठी येथील ग्रामस्थ गेली १० ते १५ वर्षे प्रयत्न करत होते. अनेक निवडणुका या मुद्द्यावर झाल्या. पण या विषयाकडे दुर्लक्ष होते. पण मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी या प्रश्नाला वाचा फोडली. माजी सभापती बबनराव देसाई यांनी आपल्या फंडातून या गल्लीच्या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खऱ्या अर्थाने वाचा फोडली. पुन्हा ग्रामपंचायतीने २५/१५ मधुन उर्वरीत काम पुर्ण केले. या कार्याबद्दल अडकूर ग्रामस्थ व रवळनाथ गल्लीतील ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांंच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. 

No comments:

Post a Comment