कै. नरसिंगराव पाटील यांच्यासारखी मलाही साथ द्या, मतदार संघाचा कायापालट करतो - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2023

कै. नरसिंगराव पाटील यांच्यासारखी मलाही साथ द्या, मतदार संघाचा कायापालट करतो - आमदार राजेश पाटीलतेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         स्व. नरसिंगराव पाटील यानी मतदार संघात सहकार पंढरी उभी केली या माध्यमातून हजारो कुटुंबे उभी केली. त्यांच्याच तत्वावर व शिकवलेल्या मूल्यावर मी उभा आहे. यातून मतदार संघाच समतोल विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असून कै. नरसिंगराव पाटील यांच्या पाठीशी राहून जशी खंबीर साथ दिला तशीच येथून पुढेही मला साथ दिल्यास मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे आमदार राजेश पाटील यानी विचार व्यक्त केले.

   म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे कै. आमदार नरसिंगराव पाटील यांच्या ७ व्या पुण्यतिथी दिना निमित्य आयोजित कार्यक्रमात आमदार राजेश पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंदगड मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष रामाप्पा करिगार होते. सर्व प्रथम आमदार राजेश पाटील यांच्या व विविध मान्यवरांच्या हस्ते कै नरसिंगराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरानी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहीली.

      यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, सर्वानी साथ दिल्याने 700 कोटी पेक्षा अधिक विकास कामे केली. उचंगी प्रकल्पाचे श्रेय जमिनी देणाऱ्या लोकांना द्यावे लागेल. तुम्हा सर्वांच्या ताकदीवर आमदार राजेश पाटील उभा आहे. एक वर्ष विरोधी बाकावर असल्याने निधी मिळाला नाही. म्हणून भागाच्या विकासासाठी सात्तेत सहभागी होऊन अजित पवारांन साथ दिली. सत्तेत सहभागी होताच २५ कोटी बजेट मंजूर झाले तर ८०  कोटी कामावरील  बंदी उठवली. परत ८० कोटी कामे प्रस्तावित आहेत.

       सर्वसामान्य माणसांचे काम हेच ध्येय असून  अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली एम. आय. डी. सी. मध्ये उद्योग आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. काजू बोंड प्रकल्पासाठी प्रयत्नशिल आहे. प्रसंगी दौलत साठी सुध्दा लढा उभा करायची तयारी वेळ आली तर  कार्यकर्त्या नी सज्ज रहावे असे आवाहन केले.  मला साथ व ताकद द्या मी निश्चित विकास देतो असे आमदार श्री पाटील यानी विचार व्यक्त केले.

      यावेळी जयसिंग चव्हाण बोलताना म्हणाले, ``जेवढे प्रेम बाबा कुपेकरावर गडहिग्लज करांचे होते तेवढेच प्रेम आमदार राजेश पाटीत यांचेवर आहे. मला मत्री पद नको, लाल दिवा नको पण मतदार संघासाठी १०० कोटी द्या म्हणणारे आमदार राजेश पाटील देशातील प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे लाभार्थी आहेत. राज्यात कसलेही वादळ आले तरी गडहिंग्लजच्या राष्ट्रवादी बालेकील्याची एक विटही हलणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी चे अध्यक्ष रामाप्पा करिगार यांनी आमदार पाटील याना साथ देण्याचे  आवाहन केले.

           म्हाळेवाडीचे सरपंच सी. ए. पाटील, विष्णू आढाव,  सरपंच गुलाब पाटील,  सरपंच प्रकाश पाटील (सावत वाडी) दशरथ कुपेकर ( मासेवाडी ) रवि गिणची (माद्याळ ) बंडू चिगरे , जयकुमार मन्नोळी (हलकर्णी ) के डीसी संचालक संतोष पाटील , महाबळेश्वर चौगुले , अनिल  सुरुतकर आदिनी स्व .नरसिंगराव पाटील यांच्या कार्याचा आढाव घेतला.

         या कार्यक्रमाला गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अभयबाबा देसाई , तानाजी गडकरी , अशोकबाळ देसाई , मुन्नासो नाईकवाडी , भरमाना गावडा , जोतिबा भिकले , अभिजित पाटील , संदिप शिंदे , एस एल पाटील  यांच्यासह विविध क्षेत्रातीत मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . आभार भिकू गावडे यानी मानले.

No comments:

Post a Comment