राजगोळी खुर्द येथे एक पुस्तक शाळेसाठी दान उपक्रम, २७१ पुस्तके जमा - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2023

राजगोळी खुर्द येथे एक पुस्तक शाळेसाठी दान उपक्रम, २७१ पुस्तके जमा

 

राजगोळी खुर्द येथे क्रांती दिना निमित्य दिप मशाल प्रज्वलन करताना माजी सैनिक.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         राजगोळी खुर्द हायस्कूल राजगोळी खुर्द (ता चंदगड) येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने एक पुस्तक गावासाठी, माजी सैनिक सत्कार व क्रांती दिन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 स्वागत व प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पी .बी .कवठेकर यांनी केले. ग्रंथ दिंडी पूजन लेखनिक  महादेव तोंडले यांच्या हस्ते झाले , ज्योत प्रज्ज्वलन माजी सैनिक मनोहर दडडीकर यांच्या हस्ते झाले,श्रेया गुरव व श्रावणी भांदुर्गे  या विद्यार्थिनिंनी मनोगत व्यक्त केले, शिक्षक मनोगत श्री इनामदार यानी  केले. 

ग्रंथ दिंडीतीत महिलांचा सहभाग

       या प्रसंगी गावात वाचन संस्कृती  सुरू व्हावी  म्हणून ग्रंथ दिंडी च्या माध्यमातून " एक पुस्तक शाळेसाठी "हा अभिनव उपक्रम, मुकुंद दास भजनी मंडळाच्या सहकार्याने संपन्न झाला. या उपक्रमाला  गावातून अतिशय अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला . या ग्रंथ दिंडीमध्ये शालेय ग्रंथालय समृद्ध होण्यासाठी गावातील अनेकांनी 271 पुस्तके देणगी स्वरूपात दान केली. यामध्ये भगवतगीता, ज्ञानेश्वरी , रामायण , महाभारत, शब्दकोश, शिवचरित्र , कथा , जीवनचरीत्र, अशी विविध स्वरूपातील नामवंत ग्रंथ व  पुस्तके दान स्वरूपात मिळाली. समाजातील सर्वच घटक , संस्था,  ग्रामस्थ , शाळेतील सर्व कर्मचारी , विद्यार्थ्यांच्या सहकार्यातुन  सदर कार्यक्रम संपन्न झाला

 कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच , सदस्य,  विविध संस्थांचे पदाधिकारी , समस्त ग्रामस्थ ,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री मुराबट्टे  ,  बी बी पाटील ,  एम जे पाटील,  शिवाजी कडोलकर ,बसवानी भोसले , मुकुंद दास भजनी मंडळ या सर्वांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन श्री के ए पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment