आत्मविश्वास ही दैवी शक्ती आहे - प्रा. ए. डी. कांबळे, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नवागतांचे स्वागत - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2023

आत्मविश्वास ही दैवी शक्ती आहे - प्रा. ए. डी. कांबळे, दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नवागतांचे स्वागत

                        

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
         "जिद्द, कष्ट आणि संकटाशी सामना करण्याची मानसिकता ठेवल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यासाठी आपल्यात आत्मविश्वास हवा .आत्मविश्वास ही दैवी शक्ती आहे. आत्मविश्वाच्या जोरावर आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. म्हणून कधी ही आत्मविश्वास गमावू नका". असे प्रतिपादन   प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. ते खेडूत शिक्षण मंडळाच्या  दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्यु कॉलेजमध्ये सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन व नवगतांचा स्वागत सोहळा कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन. डी. देवळे होते. प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एम. व्ही. कानूरकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. बी. सी. शिंगाडे यांनी करून दिला. "उदात्त स्वप्ने उराशी बाळगून त्यांचा पाठलाग केल्यास आपण यश मिळवू शकतो" असे मत बी. आर. चिगरे यांनी मांडले. यावेळी प्रा. अर्चना रेळेकर, कु. अनन्या गुरव यांनी मनोगते व्यक्त केले.

     'मुलांनी आपले ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते' असे मत  कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. डी. देवळे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्युनि. कॉलेज व विद्यालयाच्या मंत्रीमंडळातील सदस्यांचे  स्वागत करण्यात आले.
       कार्यक्रमाला  चंदगड आगारप्रमुख विजय सिंह शिंदे, न्हावेलीचे सरपंच रूक्माणा  गावडे, टी. एस. चांदेकर, प्रा. व्ही. बी. गावडे, प्रा. अशोक नाडगौडा, प्रा. इ. जे. पाटील, शरद हदगल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी तर आभार प्रा. एस. एम. निळकंठ यांनी  मानले.

No comments:

Post a Comment