चंदगड पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांचा बदलीनिमित्त सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2023

चंदगड पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांचा बदलीनिमित्त सत्कार

बदलीनिमित्त गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांचा सत्कार करताना.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        चंदगड पंचायत समिती कडील गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांची बदली पंचायत समिती फलटण (जि. सातारा) येथे झाली. त्यानिमित्त पंचायत समिती चंदगडच्या वतीने त्यांचा सत्कार करणेत आला. अध्यक्षस्थानी माज- सभापती अॅड. अनंत कांबळे होते.

       प्रास्ताविक संजय चंद‌गडकर यांनी केले. चंद्रकांत बोडरे यांच्या निरोपानिमित्त सत्कार व नूतन गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांचे स्वागत करण्यात आले. चंद्रकांत बोडरे व  सुभाष सावंत यांचा सत्कार मा. अॅड. अनंत कांबळे, शांताराम पाटील, बबन देसाई व श्रीमती एस. एल. कांबळे यांचे हस्ते करणेत आला. तसेच ग्रामपंचायत संघटना, शिक्षक संघटना यांचाही सत्कार करणेत आला.

     सत्कार समारंभावेळी अॅड. अनंत कांबळे, बबन  देसाई, शांताराम पाटील, अमर गारवे, दयानंद मोटुरे, धनाजी देसाई, सुभाष गुरव, विद्या भोज, अनिल शिवणगेकर, प्रकाश देसाई, श्रीमती एस. एल. कांबळे, बी. एम. कांबळे, एस. एम. ढोंबरे यांनी मनोगते व्यक्त केली.

         या वेळी चंद्रकांत बोडरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, चंदगड तालुक्यातील लोकांच्यामध्ये भरपूर प्रेम आहे. साधी माणसे व कष्टाळू आहेत. निसर्गरम्य तालुका आहे. चंदगड तालुक्यातील हवामान आरोग्यदायी आहे. चंदगड तालुक्यातील नागरि कांब आयुष्यमान वाढते. तिन वर्षात तालुक्यातील सर्व नेतेमंडळी, पदाधिकारी व सर्व सरपंच नागरिक यांनी चांगले सर‌कारी व प्रेम केले. त्या बद्दल सर्वांच मानतो. चंदगड तालुका हा आधार स्मरणात कायम राहिल. पंचायत समित्रिकडील सर्व- पदाधिकारी, खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी आंधे मोलाचे सहकार्य लाभले.

        अध्यक्ष भाषणात अँड. अनंत कांबळे यांनी चंद्रकांत बोडरे यांच्या कामाचे कौतुक केले. श्री. बोंडरे यांनी कोरोना व पूरपरिस्थितीत उत्कृष्ट काम केले आहे. पदाधिकारी व अधिकारी यांच्यास चांगला समन्वय ठेवून तालुक्याच्या विकासाला चालना दिली. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ बोवरच्या घरापर्यंत झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले.

           कार्यक्रमाला पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार तानाजी सावंत यांनी मानले.

No comments:

Post a Comment