किणी येथे श्री अष्टविनायक (आत्मा) शेतकरी गटा मार्फत वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

08 August 2023

किणी येथे श्री अष्टविनायक (आत्मा) शेतकरी गटा मार्फत वृक्षारोपण

 

वृक्षारोपन करताना शेतकरी गटाचे सदस्य.

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

      किणी (ता. चंदगड) आज काल दर वर्षी गावोगावी शेकडो झाडांचे वृक्षारोपण केले जाते. परंतु त्या झाडांचे संगोपनाची काळजी योग्यरित्या न घेतल्याने लावलेल्या झाडापैकी बरीचशी झाडे मरतात व पुढील वर्षी त्याच जागी नवीन वृक्षारोपण केले जाते. तेंव्हा आपण नवीन किती झाडे लावतो व कशी जगवता येतील. या जबाबदारीने वृक्षारोपण करून पर्यावरण संगोपन करणे महत्वाचे आहे. 

       या उद्देशाने मंगळवार दि. ८ रोजी किणी येथील श्री अष्टविनायक (आत्मा) शेतकरी गटा मार्फत गटाचे अध्यक्ष संजय कुट्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या दुतर्फा जंगली जांभूळ, करंज, उंबर या जातीच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या झाडांना कुपनसुद्धा केले. या प्रसंगी सरपंच संदीप बीर्जे, ग्रामसेविका सौ. संपत्ती चौगुले आवर्जून उपस्थित होते. तसेच गटाचे उपाध्यक्ष मारुती गवंडी, सचिव सुनील मनवाडकर, सदस्य लक्ष्मण पाटील, पुंडलिक बीर्जे, सचिन पाटील, रामू गवंडी, म्हातु कुट्रे, परशराम मणगुतकर, पुंडलिक पाटील, धोंडिबा हदगल, कल्लापा कुंभार सदस्या सौ. संगीता मणगुतकर उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment