तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
नेसरी (ता गडहिंग्लज) येथील हर्षवर्धन रवींद्र हिडदुगी याची दहा मीटर एअर रायफल नेमबाज (ज्युनिअर गट) राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अहमदाबाद (गुजरात) येथे नुकत्याच झालेल्या पूर्व राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेत त्याने ४०० पैकी ३८५ गुण प्राप्त करून त्याने सहावा क्रमांक पटकावला आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये भोपाळ (मध्य प्रदेश) येथे सदर राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत.
हर्षवर्धनचे येथील टी. के. कोलेकर महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याला डेरवण (रत्नागिरी) येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत चालवल्या जाणाऱ्या स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, प्रशिक्षक सागर साळवी, सुरज साळवी, डॉ. कंचन बेल्लद यांचे मार्गदर्शन तर संस्थाध्यक्ष ॲड हेमंत कोलेकर, प्राचार्य डॉ एस बी भांबर, सामाजिक कार्यकर्ते सुनील अबदागिरी, गुलाबराव पाटील, शिवाजीराव हिडदुगी, रविंद्र दिडदुगी यांचे प्रोत्साहन मिळाले. दरम्यान नेसरी ग्रामपंचायतीने हर्षवर्धनची राष्ट्रीय नेमबाज स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करून शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment