शिवनगे (ता. चंदगड) येथील विलास मारुती पाटील (वय - ४५ वर्षे) या शेतकऱ्याची ऊसतोड मजूर पुरवितो असे सांगून संतोष श्रीमंत चिलवंते (रा रत्नापूर ता कळम जि उस्मानाबाद) याने ४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी संतोष चिलवंते यांच्या विरोधात आज चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, संतोष श्रीमंत चिलवंते (रा . रत्नापूर ता कळंब जि . उस्मानाबाद) याने दिनांक 11/06/2017 रोजी ते 02/11/2017 रोजी दरम्यान मुदतीत फिर्यादी विलास पाटील यांच्या देना बैंक (बैंक ऑफ बडौदा) शाखा माणगाव (ता. चंदगड) व स्टेट बैंक ऑफ इंडीया शाखा (कोवाड) (ता. चंदगड) या बँकामधून 4.50,000/- रुपये रोख रक्कम ऊसतोड कामगार पुरवतो म्हणून रक्कम घेतली.
विलास पाटील यांनी हेमरस कारखाना (ओलम अँग्रो इंडीया प्रा.लि.) राजगोळी खुर्द (ता. चंदगड) यांचे बरोबर उसतोडणी व ऊस वाहतुकीकरीता सन 2017-2018 हंगामा करीता भाडेकरार पत्र केले आहे. यातील संशयित संतोष चिलवंते याने फिर्यादी यांचे ट्रॅक्टरवर उसतोडणी करीता 07 कोयले (14 मजूर) मजूरीकरीता देतो असे सांगून फिर्यादी यांचेकडून मजुर देणेचे मोबदल्यात 4,50,000/- रु घेवून फिर्यादी यांना उसतोडणी करीता मजुर न पुरविता त्यांची फसवणुक केली. त्यामूळे विलास पाटील यांनी चंदगड पोलिसांत फिर्याद दिलेने यातील संशयित संतोष श्रीमंत चिलवंते याचेवर भादवि कलम 420 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनासाठी पोसई श्री. बारामती हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment