संग्रहित छायाचित्र |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
मलगड (ता. चंदगड) येथे विठठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड, ता. चंदगड) या युवकाने काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद सुबराव धोंडीबा जाधव (वय 75 वर्षे ) धंदा-शेती (रा. मलगड) यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. २२ ऑगष्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विठठल रोंगाप्पा जाधव याने आपल्या मलगड गावच्या हद्दीत `ब्रम्ह` नावचे काजूचे झाडाला नायलॉनच्या दोरीने गळ्याला गळफास लावून घेवून आत्महत्या केली. याबाबतची वर्दी सुबराव जाधव यांनी समक्ष चंदगड पोलीस ठाणे येथे हजर राहुन दिलेने वरीलप्रमाणे मयत दाखल झाले आहे. मयताचे प्राथमिक तपासाकरीता पो. स. ई कांबळे, स. पो. फौ. कसेकर, पो. ना. श्री. डोंगरे यांना घटनास्थळी पाठवून तपास करण्यात आला. सदर मयताचा पुढील तपास पो. नि. संतोष घोळवे यांच्या आदेशान्वे पोसई श्री. कांबळे करत आहेत.
No comments:
Post a Comment