सहकाराचे जाळे टिकवणे ही सर्वांची जबाबदारी - आमदार राजेश पाटील, हलकर्णी येथे डिस्काउंट कार्डचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2023

सहकाराचे जाळे टिकवणे ही सर्वांची जबाबदारी - आमदार राजेश पाटील, हलकर्णी येथे डिस्काउंट कार्डचे वाटप

 

चंदगड तालुका संघाच्या सभासदाना डिस्काउंट कार्डचे वितरण करताना आमदार राजेश पाटील, संचालक तानाजी गडकरी, भिकू गावडे.

तेऊरवाडी /  सी. एल. वृत्तसेवा

          कै. नरसिंगराव पाटील यांनी उभे करून  घट्ट विनलेले सहकाराचे जाळे पुढे नेण्याचा माझा प्रामाणिक  प्रयत्न आहे. विना सहकार नाही उद्धार या प्रमाणे सहकाराचे जाळे टिकवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे विचार आमदार राजेश पाटील काढले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील तूळशी बाजार च्या हॉलमध्ये चंदगड तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीन कार्य क्षेत्रातील सभासद व ग्राहकांना डिस्काउंट कार्ड चे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी आमदार पाटील अध्यक्ष स्थानवरून बोलत होते .

        प्रारंभी कै. नरसिंगराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आमदार पाटील पुढे बोलताना म्हणाले, ``चंदगड तालूका सघ शेतकरी सभासदांचे हित जोपासत सर्वाधिक लाभांष  देत आहे. संघाचे काम सर्वांच्या सहकार्यातून उत्तम चालू आहे. भविष्यात क्रियाशिल सदस्य राहण्यासाठी प्रत्येक सभासदाने संघाच्या शाखातून वस्तूंची खरेदी करणे गरजेचे असून सहकार वाचविण्याची व वाढविण्याची जबाबदारी ही सभासदांची असल्याचे आमदार पाटील यानी सांगीतले.

          यावेळी जानबा चौगुले, तालूका संघ मॅनेजर एस. वाय. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे  तालूका अध्यक्ष भिकु गावडे,  'संघाचे संचालक तानाजी गडकरी, विठ्ठल पावले, केडीसीसीचे डीओ अशोक खराडे, नवमहाराष्ट्र चे सहसचिव पी. वाय. पाटील आदि मान्यवरासह संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपास्थित होते.

No comments:

Post a Comment