म्हाळेवाडीचा "दक्ष" चमकला, आर्मी फोर्स मेडिकल कॉलेज पूणे येथे गुणवत्तेच्या जोरावर मिळाला एमबीबीएसला प्रवेश - चंदगड लाईव्ह न्युज

14 August 2023

म्हाळेवाडीचा "दक्ष" चमकला, आर्मी फोर्स मेडिकल कॉलेज पूणे येथे गुणवत्तेच्या जोरावर मिळाला एमबीबीएसला प्रवेश

 

कु. दक्ष दिलिप पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       देशसेवेचा वसा जपणारं... आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहिद जवानांच्या स्मृती जपणार म्हाळेवाडी (ता. चंदगड) हे गाव. अशा या गावातील कु. दक्ष दिलिप पाटील या एका माजी सैनिकाच्या मुलाने MBBS साठी आर्मी फोर्स मेडिकल कॉलेज पूणे येथे गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवल्याने दक्षचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

       देशाची सेवा बजावून भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले म्हाळेवाडी गावचे सुपुत्र दिलीप आप्पाजी पाटील हे माजी सैनिक आज नोकरीनिमित्त बाहेर आहेत. पण त्यांचा मूलगा दक्ष  याने शैक्षणिक भरारी घेऊन वैद्यकिय क्षेत्रात MBBS या डॉक्टर पदवीसाठी आर्मी फोर्स मेडिकल कॉलेज पुणे येथे प्रवेश मिळवलेला आहे. त्याने NEET Exam मध्ये 720 पैकी 640 गुण मिळवत म्हाळेवाडी गावच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दक्ष ने मिळवलेलं हे उल्लेखनिय यश निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशाबद्दल कु. दक्षचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment