चंदगड नगरपंचायतीच्या वतीने 'मेरी माटी मेरा देश' अभियान - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2023

चंदगड नगरपंचायतीच्या वतीने 'मेरी माटी मेरा देश' अभियानचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड येथे स्वातंत्र्याचा 76 वा अमृत महोत्सव अंतर्गत "मेरी माटी मेरा देश" या अभियानाला चंदगड तालुक्याचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी उपस्तिथि दर्शवली. आजच्या दिवशीचे ध्वजारोहन आमदार राजेश पाटील  यांच्या शुभहस्ते झाले. तसेच या अभियान अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक व शहिद जवान यांच्या शिलाफलक अनावरण व अमृत वृक्षारोपन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. 

    तसेच यावेळी पंचप्राण शपथ घेण्या बरोबरच  शहिद जवान यांना नमन केले. हा स्वातंत्र्याचा 76 वा अमृत महोत्सव नागरिकांनी हर घर तिरंगा' हा  उपक्रम राबवून नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन केले. यावेळी चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राची कानेकर, उप नगराध्यक्ष फिरोज मुल्ला, सर्व नगरसेविका व नगरसेवक, नगरपंचायत मुख्य अधिकारी जाधव, दयानंद कानेकर, आणाप्पा हूबरवाडी, राजेन्द्र परिट, प्रमोद कांबळे, तसेच चंदगड नगरपंचायतीचे ग्रामस्थ सर्व विर पत्नी, आजी-माजी जवान उपस्तिथ होते.No comments:

Post a Comment