१९७१ च्या युद्धात कालकुंद्री येथील शहीद जवानाला ग्रामस्थांचे अभिवादन - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2023

१९७१ च्या युद्धात कालकुंद्री येथील शहीद जवानाला ग्रामस्थांचे अभिवादन

 

केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री समोर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्थापित शीला फलकाचे अनावरण करताना सरपंच उपसरपंच यांच्यासह आजी-माजी सैनिक व मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    'माझी माती माझा देश' उपक्रमांतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहीद जवान को परशराम सट्टूप्पा पाटील ( चिरमुरकर) यांच्या स्मृति शिला फलकाचे कालकुंद्री (ता. चंदगड) येथे अनावरण करण्यात आले.  

गावातील सर्व आजी-माजी सैनिकांनी परशराम पाटील यांच्या घरासमोरील स्मारकास अभिवादन केले.

    कालकुंद्री येथील जवान परशराम पाटील १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात शहीद झाले होते. कालकुंद्री सह कोल्हापूर जिल्हा व देशाच्या इतिहासात त्यांचे नाव अमर झाले आहे. ग्रामपंचायत कालकुंद्री यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री आवारात संपन्न झाला. यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, गावातील आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शहीद जवानाच्या कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment