चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

29 August 2023

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. त्यांच्या जादुई खेळामुळे 1928 ,1932 आणि 1936 अशा सलग तीन ऑलिंपिक स्पर्धा मध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. जर्मनीचा हुकुमशाह हिटलर हा देखील मेजर ध्यानचंद यांच्या खेळामुळे भारावून गेला होता. 

       2021 पासून भारतीय खेल रत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने दिला जात आहे. तथापि आजही त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारापासून वंचित ठेवलेले आहे. त्यांना भारतरत्न मिळावा म्हणून सर्व क्रीडा रसिकांनी प्रयत्न केले पाहिजेत. असे मनोगत क्रीडा विभाग प्रमुख प्रा. एस. एम. पाटील यांनी केले. यावेळी प्राचार्य पाटील यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला खेळाडू, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. ए. डी. कांबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment