चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2023

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

 

राधाकृष्णन व जे. पी. नाईक यांच्या प्रतिमापूजन करताना मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. व्ही. के. गावडे यांनी 'देशाच्या जडणघडणीत शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्त्व असते असे मत व्यक्त केले. या देशातील एका सामान्य शिक्षकाला राष्ट्रपती पदाचा सर्वोच्च बहुमान प्राप्त झाला.  यावरून शिक्षक हे नेहमीच समाजाला आदर्शवत वाटतात हेच सिद्ध होते.' असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीचा आढावा घेऊन शिक्षण महर्षी जे. पी. नाईक यांच्याही कार्याचा थोडक्यात परामर्श त्यांनी घेतला.

   ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. के. सावंत व प्रा. टी. एम. पाटील यांनी जे. पी. नाईक व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्रा. आर. ए. कमलाकर यांनी गंथालयास कार्तवीर्यार्जुन पुराण हा त्रिखंडात्मक ग्रंथ भेट दिला. संजीवनी बिर्जे, मुबिना सय्यद, सीमा जगताप, सानिया मुल्ला या विद्यार्थिनीनी अध्यापन केले. कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment