चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2023

चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन साजराचंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. सर्वपल्ली  राधाकृष्णन, कै. माजी  आमदार न. भु. पाटील, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक  यांच्या प्रतिमांचे पूजन  प्राचार्य एन. डी. देवळे यांनी केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्या निळकंठ हिने केले. 

     "शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. असे प्रतिपादन  प्राचार्य एन. डी. देवळे यांनी केले. यावेळी संजय साबळे यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. मुलांच्या लेखन कौशल्याला वाव देण्यासाठी आंतरशालेय निबंध स्पर्धाचे  आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धत एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राचार्य एन. डी. देवळे यांच्या हस्ते रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

मोठ्या गटात अनुक्रमे

        कु. गौतमी प्रशांत वाडकर, प्राची प्रकाश उसुलकर, आर्या अनिल गावडे यांनी तर लहान गटात अनुक्रमे कु. समिक्षा भरमू पाटील, पल्लवी परशराम पेडणेकर, श्रेया तानाजी बेरडे यांनी क्रमांक पटकावले.

      यावेळी इ. आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेटवस्तु देऊन  आदरभाव जपला. कु. झोया मुल्ला, वेदांत उंबरे, दिशा देसाई अन्य नागुरव आर्षद कंड गोळी जियान काझीया विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ अध्यापक टी. एस. चांदेकर, टी. व्ही. खंदाळे, व्ही. टी. पाटील, जे. जी. पाटील, व्ही. के. गावडे, डी. जी. पाटील, बी. आर. चिगरे, सचिन शिंदे, सूरज तुपारे, शरद हदगल, रवि कांबळे, पुष्पा सुतार, विद्या डोंगरे, वर्षा पाटील, ओंकार पाटील, एस. पी. भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका उंबरे तर आभार सुकन्या आनंदाचे हिने मानले.

No comments:

Post a Comment