हत्तरगी येथील हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठात गोकुळ अष्टमी उत्सव, गायक अजित कडकडेंची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2023

हत्तरगी येथील हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठात गोकुळ अष्टमी उत्सव, गायक अजित कडकडेंची उपस्थिती

डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      हत्तरगी (यमकनमर्डी) ता. हुक्केरी, जि बेळगाव येथील हरिकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठात गोकुळ अष्टमी उत्सव बुधवार दि. ६ ते ९ सप्टेबर पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी यांनी चंदगड लाईव्ह न्यूज प्रतिनिधीशी बोलताना दिली.

     बुधवार दि ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बेळगावचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते मठाच्या महाद्वार कमाणिचे भूमिपूजन व  श्री हरी नगर नामकरण सोहळा होणार आहे. यानंतर शाहूवाडी येथून येणाऱ्या दिंडीचे स्वागत, सायंकाळी ६ नंतर रजत कुलकर्णी (बेळगाव) यांचा गायनाचा व सौ स्वरदा पटवर्धन (सांगली) याच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच याच दिवशी संगीत भजन स्पर्धा होणार आहेत. गुरुवार दि ७ सप्टेंबर रोजी सकाळी रुद्राभिषेक व सायंकाळी ५ वाजता अभिषेक काळे (सांगली) व  ६ वाजता  सुप्रसिद्ध गायकअजित कडकडे यांच्या गायनाचा कार्यक्रम  होणार आहेत. यावेळी वेणूगोपाल गोसावी उपस्थित राहणार आहेत. रात्री कोल्हापरच्या स्वामी समर्थ मंडळाचे सोंगी भजन होणार आहे. शुक्रवार ८ रोजी गोपाळकाला व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आनंद उर्फ नृसिंह गोसावी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment