जालना दंगल प्रकरण, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, वंचित बहुजनची मागणी, मराठा समाजाला पाठींबा - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2023

जालना दंगल प्रकरण, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, वंचित बहुजनची मागणी, मराठा समाजाला पाठींबा

  

तहसिलदार राजेश चव्हाण यांना निवेदन देताना वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करून गृहमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी मराठी समाजावर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी चंदगड तालुका वंचित बहुजन आघाडीने केली. याबाबतचे निवेदन आज तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले.

       दि. २९ ऑगस्ट पासून मराठा आरक्षण प्रश्नी जालना जिल्हातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे 'मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतुत्वा खाली शांततेने न्याय हक्कासाठी आमरण उपोषण चालू होते. पण अचानक पोलीस बळाचा वापर करून उपस्थित महिला, लहान मुले यांच्यावर लाठी हल्ला करत. बंदुकीचा धाक दाखवत फायर करणे, अश्रूधुराचा वावर करणे असे दुष्यकृत्य करून आंदोलन दडपण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीसांकरवी केले आहे. त्याचा आम्ही निषेध करून मराठा अंदोलनाला पाठींबा देत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

      या शिवाय मराठा आंदोलनावर लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कार्यवाही करावी, महाराष्ट्र शासनाची नैतिक जबाबदारी स्विकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दयावा, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

       यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू कार्वेकर, संघटक परशराम कांबळे, विठ्ठल कांबळे, महादेव कांबळे, आर. पी. कांबळे, शिवाजी कांबळे, जोतिबा गोरल, प्रा. ए. डी. कांबळे, संतोष कांबळे, दशरथ कांबळे, जोतिबा गोरल, विजय पवार, एकनाथ वाके, चंद्रकांत गावडे, इमराज मदार, राजू वंजारे, अंकुश कांबळे, विश्वनाथ कांबळे, आकाश सुतार आदीसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment