डॉ. जाधव यांच्या 'मराठ्यांची शस्त्रास्त्रे- एक चिकित्सिक अभ्यास' प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठाचे अनुदान मंजूर - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2023

डॉ. जाधव यांच्या 'मराठ्यांची शस्त्रास्त्रे- एक चिकित्सिक अभ्यास' प्रकल्पासाठी शिवाजी विद्यापीठाचे अनुदान मंजूर

 

डाॅ. मधुकर विठोबा जाधव

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा  

        येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विषयाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ. मधुकर विठोबा जाधव यांना ‘मराठ्यांची शस्त्रास्त्रे- एक चिकित्सिक अभ्यास' या विषयासाठी शिवाजी विद्यापीठाचा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यासाठी त्यांना  एक लाख रूपयाचे अनुदान मंजूर झाले आहे. डॉ. मधुकर जाधव यांनी शिवाजी विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळावर व शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेवर काम केले आहे. 

     संजय घोडावत आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र व मानव्यशास्त्र अभ्यास मंडळावर तर सातारा इतिहास परिषदेच्या कार्यकारणीवर कार्यरत आहेत. त्यांची दोन पुस्तके व 133 शोधनिबंध प्रकाशित आहेत प्रतापराव गुजर - एक कर्तबगार सरसेनापती या विषयावर युजीसीचा प्रकल्प पूर्ण केला आहे. ते मराठी विश्वकोष, शिवाजी विद्यापीठ बहिस्थ शिक्षण विभागासाठी लेखन करत आहेत. विविध वृत्तपत्रांत, मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित होतात. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी आजवर महाराष्ट्र , कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश आदी ठिकाणी विविध विषयांवर जवळपास ८५० च्या वर व्याख्याने दिली आहेत. या यशाबद्दल दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ .बी.डी.अजळकर यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment