चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
'कला क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यानी सातत्य ठेवून कौशल्य सादर करा. विद्यार्थ्यांचे कलागुण अशा कार्यक्रमातून दिसत असतात. सर्वांनी नाविन्यपूर्ण गोष्टींना वाव द्यावा . प्रयत्न करत रहा यशापर्यंत पोचाल. आपल्या महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग कौतूकास्पद काम करत असतो याची प्रचिती नॅक मुलांकना दरम्यान आली हे खूप अभिमानास्पद आहे. महाविद्यालयाचे नाव विद्यार्थ्यानी अधिक उज्वल करण्यासाठी आपल्यातील सुप्त गुणांना वाव द्या.' असे प्रतिपादन दौलत विश्वस्थ संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी केले.
ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्थ संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविधालयात आयोजित 'यशवंत महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ बी डी अजळकर होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, नॅक समन्वयक डॉ आर ए घोरपडे, एन एस एस प्रमुख प्रा.यु एस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी या यशवंत महोत्सवामागील उद्देश आपल्या प्रास्ताविकावून प्रा. प्रदिप बोभाटे यांनी स्पष्ट केला. या वेळी सर्वं मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ बी डी अजळकर यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील बी.कॉम भाग ३ ची विद्यार्थीनी इंद्रायणी पाटील हिने बेळगाव येथील वकतृत्व स्पर्धेत यश मिळवलेबद्दल तिचा गौरव करण्यात आला.
या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गित गायन स्पर्धा, समुहगान तसेच एकपात्री स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या विविध स्पर्धांत विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
वक्तृत्व स्पर्धेत इंद्रायणी पाटील बीकॉम ३), साहिल कांबळे (बीएससी १) ऐश्वर्या पाटील (बीकॉम २) यानी अनुक्रमे नंबर मिळविले. तर एकपात्री अभिनय स्पर्धेत हर्षद कांबळे बीकॉम 3) यांने प्रथम क्रमांक आणि ज्योती पेडणेकर बी.कॉम २) हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तर वैयक्तिक लोकनृत्य स्पर्धेत निकिता पाटील प्रथम, समीक्षा पाटील द्वितीय, आणि आरती पाटील हिने तृतीय क्रमांक पटकाविला. तर सांघिक प्रकारात रोशन ग्रुप प्रथम आणि जगदंब ग्रुप द्वितीय ठरला. गायन स्पर्धेत हर्षद कांबळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला ऐश्वर्या पाटीलहिने द्वितीय क्रमांक तर आकांक्षा सुतार हिने तृतीय क्रमांक पटकाविला. मोहन स्पर्धेत शिवतेज ग्रुप प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धेत अनिकेत सुतार बीए 2) यांनी प्रथम क्रमांक पटकावला .मधुरा सुतार यांनी द्वितीय क्रमांक मयुरी सुतार बिकॉम १) यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर मधुरा ढेकोळकर (बीए १) हिला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. या विविध स्पर्धांसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी यशस्वीरित्या परीक्षक म्हणून काम पाहिले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रा यु एस पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा प्रदीप बोभाटे यांनी केले.
No comments:
Post a Comment