शिनोळी येथे जेनेरिक औषध दुकानाचे उद्घाटन, अत्यल्प किमतीत मिळणार औषधे - चंदगड लाईव्ह न्युज

06 September 2023

शिनोळी येथे जेनेरिक औषध दुकानाचे उद्घाटन, अत्यल्प किमतीत मिळणार औषधे

 

शिनोळी येथे आशिर्वाद जेनेरिक मेडिकल स्टोअर्सच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         शिनोळी (ता. चंदगड) येथे समाजातील गरीब व गरजू लोकांना कमी किंमतीत औषधे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने आशिर्वाद जेनेरिक मेडीकल स्टोअर्सचे उद्घाटन शिनोळीचे शुभांगी वायंगणकर - माजी नगराध्यक्ष म्हापसा गुरुदास वायंगणकर माजी नगरसेवक म्हापसा यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितित पार पडले.  

       परिसरातील गरीब व गरजू रुग्णाना ३० ते ७० % पर्यत औषधावर सवलत देणार असल्याचे दुकान मालक गौरेश पाटील यानी सांगीतले. या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

      यावेळी  सरपंच परशराम पाटील, गजानन पाटील, बी. के. पाटील, नारायण पाटील, जिवबा कनगुटकर, हर्षवर्धन कोळसेकर, सातेरी पाटील, अरुण पाटील, बाळू पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. स्वागत  गौरेश  पाटील यांनी केले तर आभार एन. आर. भाटे यांनी मानले.

No comments:

Post a Comment