![]() |
माणगाव येथे राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत आयोजित पाककृती प्रदर्शन |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम अंतर्गत माणगाव बिट मधील सर्व अंगणवाड्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दि. ४ सप्टेंबर रोजी माणगाव येथे झालेल्या विविध पालेभाज्या, फळभाज्या, पोषक आहार प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ वनिता इष्टे यांच्या हस्ते झाले.
![]() |
राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत माणगाव येथे अंगणवाडी सेविकांनी काढलेली जनजागृती प्रभात फेरी |
प्रदर्शनात बिट मधील जक्कनहट्टी, घुलेवाडी, म्हाळेवाडी, शिवणगे, लकिकट्टे, माणगाववाडी, हुंबरवाडी, लाकूरवाडी, माणगाव, बसर्गे, गौळवाडी, रामपूर, मलगड, बागिलगे आदी गावातील अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला. सकाळी गावातून जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविकांनी स्वच्छता व पोषक आहार विषयक विविध घोषणा दिल्या. या प्रसंगी पर्यवेक्षिका इष्टे यांनी किशोरवयीन मुलींचा आहार व स्वच्छता, स्तनदा मातांनी बाळाला सहा महिने स्तनपान करावे, सहा महिन्यानंतर बाळाला हलका आहार द्यावा. गरोदर मातांना सकस आहार, स्वच्छता तसेच लसीकरण वेळेवर घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
अभियानांतर्गत गृहभेटी, प्रतिज्ञा, पाककृती, फळ व पालेभाज्यांचे महत्त्व याबाबत माहिती देणे असे उपक्रम राबवण्यात आले. यावेळी माणगाव बीड मधील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment