कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड (ता. चंदगड) येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीतील बहुतांशी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व त्यांच्या सवंगड्यांच्या वेशभूषेत शाळेत प्रवेश केला होता. दहीहंडी कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी केले. यावेळी अध्यापक गणपती लोहार, मधुमती गावस यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यापक श्रीकांत आप्पाजी पाटील, भावना अतवाडकर, जयमाला पाटील यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment