जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2023

जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

 

प्राचार्य पाटील यांचे समवेत यशस्वी खेळाडू.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       दि महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन च्या वतीने घेण्यात आलेल्या ३७ व्या जिल्हास्तरीय दानी क्रीडा स्पर्धेत माडखोलकर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. यावेळी खालील खेळाडूंनी यश संपादन केले. 

     अनिकेत कुट्रे- दहा हजार मीटर धावणे सुवर्णपदक, निकिता नार्वेकर- दहा हजार मीटर रेस वॉक सुवर्णपदक, कोमल गावडे- थाळीफेक व भालाफेक सुवर्णपदक सुप्रिया पाटील - हेपटयाथलान (७ डाप्रकार) सुवर्णपदक आकाश गावडे- दहा हजार मीटर धावणे कास्यपदक, अभिनव धुरे- अडथळा शर्यत दहा हजार मीटर कास्य पदक, सुरेश दोरुगडे-भालाफेक सुवर्णपदकक्रीडा विभाग प्रमुख एस. एम. पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. प्राचार्य पाटील यांनी प्रोत्साहन दिले. या खेळाडूंची रत्नागिरी येथे होणाऱ्या 37 व्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment