चंदगड येथील "माडखोलकर महाविद्यालयात हिंदी दिन सप्ताह संपन्न" - चंदगड लाईव्ह न्युज

18 September 2023

चंदगड येथील "माडखोलकर महाविद्यालयात हिंदी दिन सप्ताह संपन्न"

हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी प्राचार्य डाॅ. पाटील, हिंदी विभाग प्रमुख डॉ. पाटील, प्रा. नाडगौडा व विद्यार्थी. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     भाषा हे माणसाला जोडणारे एक प्रभावी माध्यम आहे.भाषेच्या माध्यमातून मनुष्य एकमेकाशी जोडला जातो. प्रत्येक भारतवासी राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, आणि राष्ट्रभाषेचा सन्मान  करतो. हिंदी भाषा ही जगाला जोडणारी मजबूत कडी आहे, तिचा प्रचार-प्रसार करने हितावह आहे, असे प्रतिपादन प्रा. ए. एस. नाडगौडा  यांनी केले. ते माडखोलकर महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने आयोजित "हिंदी दिन सप्ताह" कार्यक्रमात बोलत होते.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. भारताला विविधतेतून एकता आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याची परंपरा प्राचीन काळापासूनची आहे. अनेक समाजसुधारक, संत-महंतानी समाजातील जातीय व धार्मिक आडंबराच्या भिंती नष्ट करून सामाजिक समतेचा संदेश जगला दिलेला आहे. यामध्ये भाषेचे योगदान फ़ार मोठे आहे. कांही समाजविघातक शक्ती पुन्हा धार्मिक तेध व निर्माण करून युवा पिढीला भडकविण्याचे कार्य करीत आहेत. तरुणांनी या गोष्टींचा विरोध केला पाहिजेत. संविधान व लोकशाहीची जपणूक केली पाहिजे. यातच समाजाचे आणि देशाचे हित आहे. भाषा तिरस्कार करण्यापेक्षा भाषांचे संवर्धन आणि जतन करायला सर्वांनी शिकावे, असे मत डॉ. पाटील  यांनी व्यक्त केले.

      ईशस्तवन व रोपट्याला जलार्पण  करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन रूपरेषा हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. एन. पाटील यांनी समजाविली. हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, सामान्य ज्ञान, गायन-वाचन स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. फईजा नंदगडी, सचिन कांबळे, पूजा तराळ, इंदुताई कांबळे, साक्षी गावडे, डॉ एन.एस. मासाळ यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन कु. अंकिता गुरव हिने केले तर आभार डॉ. आर. ए. कमलाकर यांनी मानले.

       कार्यक्रमाला डॉ. एस. डी. गावडे, डॉ. एन. के. पाटील, डॉ. व्हि. के. गावडे, प्रा. टी. एम. पाटील, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. ए. डी. कांबळे, डॉ. एस. डी. गोरल डॉ. के. एन. निकम व विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:

Post a Comment