मराठा आरक्षण आंदोलकांना मुश्रीफांनी आश्वासन देऊन फसवले....! शिवसेनेचे पत्रक - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2023

मराठा आरक्षण आंदोलकांना मुश्रीफांनी आश्वासन देऊन फसवले....! शिवसेनेचे पत्रक


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
       मराठा आरक्षण प्रश्नी अंतरवाली सराटी (जिल्हा जालना) येथे मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तेथे जमलेल्या निष्पाप लोकांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला व अश्रुधुराची कारवाई केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. याच दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात येणार होते त्यांची गाडी अडवण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलकांनी दिला होता.     
       यावेळी आंदोलकांना भेटून गणेश चतुर्थी पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत व्यापक बैठक बोलावतो असे आश्वासन देऊन मुश्रीफ यांनी आंदोलकांना आंदोलनापासून परावृत्त केले होते. तथापि त्यांनी आश्वासन पाळले नाही. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अशा आशयाचे पत्रक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी काढले आहे. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अन्यथा मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशाराही या पत्रकात द्वारे देण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment