या मेळाव्यात उपस्थित असलेले आजी -आजोबा आणि शाळेतील शिक्षक |
नेसरी /सी. एल. वृत्तसेवा
विद्या मंदिर अर्जूनवाडी (ता. चंदगड) येथे आजी-आजोबांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे सर्वत्र कौतुक तर होत आहेच पण हा अनोखा सोहळा पाहून आजी आजोबा भारावून गेले. काहींच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले.
आजी आजोबा दिनानिमित्त गावातील सर्वात ज्येष्ठ आजोबा भरमू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विद्यामंदिर अर्जूनवाडी (ता. गडहिंग्लज) येथे या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या जीवनात आजी-आजोबांचे महत्त्व, आजी-आजोबांच्या अमूल्य संस्काराचा ठेवा जपण्याचे प्रयत्न करणे हे आजच्या पिढीला गरजेचे आहे, असे मुख्याध्यापिका सौ. प्रियांका प्रकाश देसाई यांनी विशद केले. त्यानंतर सर्व उपस्थित आजी-आजोबांचे मुलांनी पूजन केले. याप्रसंगी जेष्ठ आजी सुशीला महादेव पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी बहुसंख्य उपस्थित आजी आजोबांनी शाळेतील मुलांना खाऊ दिले. याप्रसंगी सदर कार्यक्रमाच्या आयोजन सौ. दळवी, श्री. पाटील, श्री. कोळी, वृषाली शिंदे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
No comments:
Post a Comment