अबब.! टस्कराने केले कारगाडीचे खेळणे, गाडीचा केला चक्काचूर - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2023

अबब.! टस्कराने केले कारगाडीचे खेळणे, गाडीचा केला चक्काचूर

हत्तीने चक्काचूर केलेली कार.

तेऊरवाडी / एस. के. पाटील

       देऊळवाडी (ता. आजरा) येथे आलेल्या जंगली टस्कराने दारामध्ये उभ्या केलेल्या कार गाडीलाच खेळणे बनवून त्या गाडीचा खुळखुळा बनवला.

    घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, हणमंत सावंत यांचे घर लाटगावला जाणाऱ्या मार्गावर आहे. हणमंत यानी ३ महिण्यापूर्वी जुनी कार विकत घेतली होती. आपल्या घरासमोर असणाऱ्या अंगणामध्ये  ही कार उभी केली होती. यावेळी खाणापूर परिसरात वापरणारा टस्कर हत्ती  बुधवारी रात्री १.३० च्या सुमारास देऊळवाडी फाट्यावर आला. यावेळी या फाट्यावर असणारा टायर या हत्तीने दुर भिरकवला. 

हत्तीने मोडतोड करुन शेतात भिरकावलेली कार.

        यानंतर लगेच या टस्कराने आपला मोर्चा  हणमंत सावंत यांच्या घराकडे वळवला. येथे अंगणात उभ्या असणाऱ्या कार गाडीसोबत एखाद्या लहान मुलाप्रमाणे खेळू लागला. आपल्या सोंडेने व पायाने या कारगाडीशी  खेळत - खेळत चक्क १०० मिटरपर्यंत  नेऊन ही कारगाडी भातशेतात भिरकावली. यामध्ये या कारगाडीचे प्रपंड नुकसान झाले. तसेच आजूबाजूच्या भात व ऊस शेतीचेही या टस्कराने प्रचंड नुकसान केले आहे. वारंवार शेती व वाहणांचे नुकसान करणाऱ्या या टस्कराचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

                          हत्तीकडून वाहनांची नासधूस 

      यापूर्वी चंदगड तालुक्यात हत्तीकडून दुचाकी, बैलगाडी ट्रॅक्टर अशा वाहनांची प्रचंड मोडतोड केली. आता आजऱ्यामध्ये कार गाडीचे प्रचंड नुकसान करण्यात आल्याने वाहनधारक धास्तावले आहेत.

No comments:

Post a Comment