जनता विद्यालय तुर्केवाडी येथे हिंदी दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2023

जनता विद्यालय तुर्केवाडी येथे हिंदी दिन उत्साहात साजरा


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे हिंदी दिवस  भाषण स्पर्धा त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव जी. एन. पाटील होते. 

      प्रमुख वक्ते म्हणून यशवंतराव चव्हाण हलकर्णी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा.  यु. एस. पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून  उमेश भरमाजी पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री कार्यालय मुंबई हे उपस्थित होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक एस. ए. पाटील यांनी केले. प्रमुख वक्ते यु. एस. पाटील यांनी हिंदी भाषेचे महत्व, इतिहास आणि व्याप्ती विषद केली. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यीनींनी यावेळी काव्यवाचन सादर केले. काव्य वाचनास विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. हिंदी दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी शाळेचे मुख्याध्यापक  पी. एन. यळुरकर व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. 

     सही पोषण देश रोशन अंतर्गत पाककला स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या सर्व उपक्रमात सहभाग घेतला. अध्यक्षीय भाषणात  जी. एन. पाटील  यांनी हिंदी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख एम एम मुल्ला यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  बी. एन. पाटील  यांनी मानले. यावेळी शाळेचे सर्व अध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एम. के. पाटील  यांनी केले.

No comments:

Post a Comment