वाघोत्रे येथे मुद्देमालासह गोवा बनावटीची ३५ लाखाची दारू जप्त, चंदगड पोलीसांची मोठी कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2023

वाघोत्रे येथे मुद्देमालासह गोवा बनावटीची ३५ लाखाची दारू जप्त, चंदगड पोलीसांची मोठी कारवाई

गोवा बनावटीची पकडलेली दारु, संशयित व पोलीस.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      हेरे-पारगड रस्त्यावर असलेल्या वाघोत्रे (ता. चंदगड) येथे चंदगड पोलिसानी बोलेरो पिकअप गाडी अडवून गोवा बनावटीची राॅयल चॅलेंज, राॅयल स्टॅग, मॅकडॉल, इम्पेरीअल ब्ल्यू, गोल्डन आईस,आदी  कंपन्याची  ६ लाख ४८ हजार १४४ रूपयांची दारू व दारू वाहतुक करणारी १० लाखाची  किंमतीची बोलेरो पिकअप चारचाकी गाडी व गाडीतील हौद्यात असलेले १८ लाख ७९ हजार ९१४ रुपये किंमतीचे गॅस ऑनलायझर अशा एकूण  ३५ लाख २८हजार ५८  रू.मुद्देमाल जप्त केला.चंदगड पोलीसानी बुधवारी (दि १३रोजी) ११.३०  वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. या प्रकरणी महेंद्र गंगाराम खरवत (वय वर्ष - २०, रा. कडासे, ता. दोडामार्ग, जि. सिधुदुर्ग) या संशयितावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला चंदगड येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

      याबाबत पोलिसातून मिळालेली माहीती अशी की, पारगड -मिरवेल रस्त्यावरुन हेरा गावाकडे महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी नं एम एच-०७,एजे-३ ८३५ या पांढर्या रंगाच्या गाडीतून गोवा बनावटीची दारू वाहतुक होत असलेची खबर चंदगड पोलिसांना खास खबऱ्याकडून मिळाली, त्यानुसार पोलीसानी सापळा रचून साडे आकरा वाजण्याच्या सुमारास वाघोत्रे येथे गाडी पकडली. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५,९०,१०८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पो. नि. संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हणमंत नाईक, पो. काॅ. संदीप काबंळे, पो. काॅ. अशिष कोळेकर, पो. काॅ. शिवूडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संशयिताल २ दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश
     अवैधरित्या गोवा बनावटीची दारु घेवून जात असताना चंदगड पोलिसांनी    या प्रकरणी महेंद्र गंगाराम खरवत याला ताब्यात घेतले. संशयितावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल केला. त्याला चंदगड येथील न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

No comments:

Post a Comment