चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मोरया मित्र मंडळ अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) यांच्या वतीने खास गणेशोत्सवानिमित्त आज शुक्रवार दि. २२/०९/२०२३ रोजी रात्री ८.०० वाजता भव्य रस्सीखेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या संघास रु. ६००१/- , द्वितीय क्रमांक विजेत्यास ४००१/-, तृतीय क्रमांक रु. २००१/- व सन्मान चिन्ह बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक संघात ६ खेळाडू असतील. सर्व खेळाडू एकाच गावातील असणे बंधनकारक आहे. प्रवेश फी रु. ६००/- असून नाव नोंदणीसाठी 9850844654 / 8805346677 / 7038085482 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment