अडकूर येथे रविवारी रंगणार श्वान स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

22 September 2023

अडकूर येथे रविवारी रंगणार श्वान स्पर्धातेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
श्वान प्रेमी अडकूर, आर एक्स व बिल्ला रेसिंग क्लब अडकूर (ता. चंदगड) यांच्या वतीने रविवार दि २४ सप्टेंबर रोजी अडकूर येथे सकाळी १० वाजता खुल्या श्वान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
    प्रथम  -३ हजार रुपये व ५ फुटी ढाल, द्वितिय - २ हजार रुपये व ३ फुटी ढाल, तृतिय - १ हजार १ रुपये व २ फुटी ढाल अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. श्वान प्रेमीनी या स्पर्धेसाठी ७७०९५ २९८२३ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे  करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment