तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर (ता. चंदगड) येथील रवळनाथ सार्वजनिक गणेश मंडळ, केएलई विश्वविद्यालय बेळगाव, डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्र, जे. एन. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सोमवार (दि. २५) रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, आरोग्य भाग्य योजना यासह इतर योजनांचाही रुग्णांना लाभ घेता येणार आहे. तरी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे संस्थापक जयंत देसाई - अडकूरकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment