इको केन साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ, ५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2023

इको केन साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन शुभारंभ, ५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट


चंदगड/ सी. एल. वृत्तसेवा

       इको केन शुगर एनर्जी लिमिटेड कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम कारखान्याचे संचालक सतीश अनगोळकर व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.  हंगाम सन २०२३ - २४ हंगामासाठी कारखान्याने ५ लाख टनाचे उद्दिष्ट ठेवले असून कारखाना भागातील शेतकऱ्यांचा शेवटच्या उसाचे गाळप होईपर्यंत कारखाना चालू ठेवणार आहे. यावेळी पूजेचा मान वेगवेगळ्या विभागातील ज्येष्ठ कामगारांना देण्यात आला. ज्येष्ठ  कामगारांना पूजेचा मान मिळाल्यामुळे कामगारांच्या उत्साहाचे वातावरण होते. कारखान्यावर भागातील तसेच तालुक्यातील शेतकऱ्यानी खूप प्रेम केलेले आहे. यामुळे मागील प्रत्येक हंगामात उचांकी गाळपाचा विक्रम कारखान्याने केलेला आहे. त्याचप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांच्या प्रेमाच्या जोरावर कारखाना उच्चंकी असे ५ लाखाचा टप्पा पूर्ण करणार आहे. कारखान्याचा यावर्षीचा गाळप हंगाम लवकरच सुरू होत असल्याची माहिती

      मागील हंगामात झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून तसेच भविष्यात कोणताही तांत्रिक अडचण येऊ नयेत. या हेतूने तसेच फ्री, लोडेड ट्रायल घेण्याच्या दृष्टीने बॉयलर अग्निप्रतीपण लवकर करण्यात आले. प्राथमिक बिगाड काय असतील तर त्याची दुरुस्ती वेळेत करून हंगाम विना खंडित चालवण्याचा हेतू कारखान्याचा आहे. कारखान्यासाठी आवश्यक असणारी बीड आणि लोकल यंत्रणा कारखान्याने करारबद्ध केलेली आहे. या हंगामासाठी कारखान्याने सुनियोजित कार्यक्रमाची आखणी केलेली आहे. 
     यावेळी कारखान्याचे संचालक सतीश अनगोळकर, तुडिये गावचे सरपंच विलास सुतार, कोलिकचे माजी सरपंच संभाजी गावडे, म्हाळुंगे खालसा गावच्या सरपंच जनाताई खरवत, दिलीप हुलजी सद्स्य तुडिये, केरू गावडे, गंगाराम येडणे, जनरल मॅनेजर सुनील पाटील, डी जीएम एच. आर. प्रभाकर रावल, असिस्टंट जीएम मारुती चव्हाण, चीफ केमिस्ट मनोज सखिया, व्यवस्थापक बाबासाहेब दिलीपराव देसाई, अकाउंट मॅनेजर प्रभाकर हुलजी, उपशेती अधिकारी पांडुरंग पाटील व सी. एस. हिरेमठ, अमित बाने, भरत चौगला, मधुसूदन कलगुड, केन आकॉउंट मेनेजर संजीव पाटील, मॅनेजर बाबासाहेब देसाई हे उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment