तेऊरवाडीच्या शुभम पाटीलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2023

तेऊरवाडीच्या शुभम पाटीलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 

पै. शुभम जनार्दन पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील  खेळाडू  कु .शुभम जनार्दन पाटील  यांची पूणे येथे होणाऱ्या राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अभिनंदनिय निवड झाली. जिल्हा व विभागीय स्तरावर ७७ किलो वजनी गटात गिरको रोमन कुस्ती प्रकारात कु.शुभम ने उज्वल यश संपादन केले. चि. शुभमला श्री राम तालिम मंडळाचे अध्यक्ष माजी सैनिक पै. लक्ष्मण भिंगुडे, उपाध्यक्ष सुबराव पाटील, पै. प्रकाश दळवी, पै प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन तर वडील जनार्दन पाटील आई सौ. अंजना यांचे प्रोत्साहन लाभले. या उज्वल यशाबद्दल शुभमचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment