एनसीसी प्रशिक्षणार्थिसोबत प्रशिक्षक रामराव गुंडू गुडाजी
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
अमेरिकेतील एनसीसी विद्यार्थ्यांना चक्क तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील रामराव गुंडू गुडाजी हे निवृत्त माध्यमिक क्रीडा शिक्षक धावण्याचे व शारिरीक तंदूरूस्तीचे प्रशिक्षण देत आहेत.
रामराव गुडाजी हे क्रीडा शिक्षक सिंधुदूर्ग जिल्हामध्ये सेवा करून निवृत्त झाले आहे. त्यानी आपल्या सेवा काळात जिल्हा क्रीडा संघटनेची स्थापना करून अनेक राज्य स्तरीय खेळाडू घडवले आहेत. रामराव गुडाजी यानी शिवाजी विद्यापिठ व यवतमाळ येथे झालेल्या ७० ते ७५ वर्ष वयोगटातील जेष्ठ नागरिकांच्या धावण्याच्या स्पर्धेत ४०० मि. ८०० मि व १५०० मिटर मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. वर्षातून दोन महिने प्रशिक्षक रामराव गुडाजी अमेरिका अटलांटा शहरातील सर्वात मोठी शिक्षण संस्थेच्या नार्थ स्प्रिंग स्कूलच्या इयत्ता १२ वीच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांना सकाळी 6 ते ८ वाजेपर्यंत धावण्याचे प्रशिक्षण देतात. उत्कृष्ठ प्रशिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी आनंदीत आहेत.
रामराव गुडाजी
या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अडचण येत असली तरी दिल्ली मधील एक विद्यार्थी या ग्रुपमध्ये असल्याने त्याच्याकडून हिंदीमध्ये माहिती मिळते. भारत देशापेक्षा अमेरिकेत शिक्षकांना मोठा सन्मान मिळत असून अमेरिकेमध्ये मला भारत देशातील एक प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण देण्याची संधी मिळाल्यामुळे खुप समाधान वाटते.
No comments:
Post a Comment