कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
किणी (ता. चंदगड) येथील जय कलमेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त मॅरेथॉन व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक २५ रोजी सकाळी ७ वाजता (५किमी धावणे) मॅरेथॉन स्पर्धा, तर दुपारी २ वाजता भाषण स्पर्धा होणार आहेत.
दोन्ही स्पर्धांसाठी अनुक्रमे रोख रुपये २०००, १५००, १०००, ७५१, ५०१ अशी बक्षिसे स्मृतिचिन्ह व पदक ठेवण्यात आली आहेत. भाषण स्पर्धेसाठी भारतीय सण आणि संस्कार, भ्रष्टाचाराचा भस्मासुर, मला अस्वस्थ वाटतंय, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, अमृत महोत्सवी भारत : काय कमावले काय गमावले, आई कुठे काय करते, लक्षात नसलेला बाप, बदलते राजकारण आणि लोकशाही हे विषय ठेवण्यात आले आहेत. वेळ ७ मिनिटे असेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याची आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे. 8378819950, 7666843648, 9420459379, 7083105848.
No comments:
Post a Comment