जर्मनी देशातही गणेश विसर्जनाची धामधूम, पारंपारीक वेशभूषेसह वाद्यांचा वापर - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2023

जर्मनी देशातही गणेश विसर्जनाची धामधूम, पारंपारीक वेशभूषेसह वाद्यांचा वापर

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      सर्वांचा लाडका बाप्पा गणेशा केवळ महाराष्ट्राबरोबर भारतातच नव्हे तर जर्मनी देशातही मोठ्या भक्ती भावाने पूजला जातो. आज जर्मनी देशाममध्ये सुद्धा विविध भारतीय वाद्यांचा गजर करत लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

  जर्मनी मध्ये हजारो भारतिय शिकण व नोकरी निमित्य राहत आहेत .येथील अरलेंगन शहरामध्ये सर्व भारतियांनी एकत्र येत गणेश मूर्ति चे पूजन केले होते. या भारतीयांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. आज या गणेशाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी सर्व भारतियांनी एकत्र येत भव्य मिरणूक काढली. पारंपारिक वस्त्रे परिधान करून ढोल -ताशा चा गजर हातात भगवा ध्वज खेळवत ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीमध्ये चंदगड तालूक्यातील तेऊरवाडी गावातील वैभव जनार्दन पाटील आणि त्यांचे कुटूंबीय सहभागी होऊन गणरायाला अखेरचा निरोप दिला. हजारो मैलावर राहून ही भारतीय परंपरा जपणाऱ्या या भारतियांचे कौतुक करण्यात येत आहे.No comments:

Post a Comment