तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर (ता. चंदगड) येथे ग्रामपंचायतीने गौरी गणपती विसर्जनाचे उत्कृष्ठ नियोजन केले . गौरी विसर्जन ट्रॅक्टरमध्ये तर गणेश विसर्जन परीट ओढ्यावर निर्माण केलेल्या कुंडामध्ये करण्यात आले.
आज पाच दिवसांच्या घरगुती बाप्पांचे व गौरी चे विसर्जन करण्यात आले. अडकूर ग्रामपंचायतीने या गणेश विसर्जनाचे चांगले नियोजन केले. या अंतर्गत गावामध्ये जनजागृती करून निर्माल्य नदित न टाकता ते ट्रॅक्टरमध्ये जमा करण्याचे म्हणजे निर्माल्य संकलन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यानुसार आज ग्राम पंचायत सदस्या सौ. सुलोचना राजेंद्र घोळसे यानी यांनी आपल्यापासून या उपक्रमाची सुरवात केली. सौ. सुलोचना घोळसे यानी ट्रॅक्टमध्ये गौरीचे विसर्जन करून इतर ग्रामस्थांनाही निर्माल्य दान करण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment