चंदगड तालुक्यातील 10 जणांविरुद्ध २८ सप्टेंबरपर्यंत बंदी आदेश लागू - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2023

चंदगड तालुक्यातील 10 जणांविरुद्ध २८ सप्टेंबरपर्यंत बंदी आदेश लागू


चंदगड / प्रतिनिधी
       चंदगड तालुक्यातील दहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याना तालुका बंदी आदेश लागू केला.सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंदगड पोलिस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली.
      २८ सप्टेंबरपर्यंत हा बंदी आदेश लागू असणार आहे.सचिन हावनाप्पा नाईक (रा.आमरोळी),चाळोबा केरु मुतकेकर (रा. हाजगोळी),भिमा बल्लाप्पा सनदी (रा.यरतेनट्टी),संजय दत्तु दुकळे (रा.मुरकुटेवाडी),उत्तम लक्ष्मण नाईक(रा.हलकर्णी),राजाराम विष्णु पाटील(रा.तडशिनहाळ),गजानन जानबा गावडे (रा. नागणवाडी),साजिद महमद ऊसेन सनदी (रा.हिंडगाव रोड चंदगड),पांडुरंग जोतीबा आपटेकर (रा.कागणी),कृष्णा रामु नरी (रा.माणगाव) यां दहा जणांवरोधात विरोधात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.या दहा जणांच्या विरोधात चंदगड पोलिस ठाण्याने प्रस्ताव तयार करून तो चंदगड तहसीलदारांना पाठविला होता.त्याप्रमाणे हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.या दहा जणांच्या २८ सप्टेंबरपर्यंत तालुक्यात प्रवेशास मनाई आहे. याबाबतची माहिती पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांनी दिली.

No comments:

Post a Comment