तुडये येथील महाविघालयात मेरी माटी मेरा देश उपक्रमात कलश पूजन करताना प्राचार्य सौ. एस. एम. देसाई व निवृत्त जवान |
चंदगड/ सी. एल. वृत्तसेवा
तुडये (ता. चंदगड) येथील नरसिंगराव गुरुनाथ पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत मेरी माटी, मेरा देश उपक्रम व देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सकाळी सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागातून गावामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी गावातील सरपंच सदस्य व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये मेरी माटी मेरा देश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य एस. एम. देसाई, प्रमुख पाहुणे एन. बी. मोरे (माजी सैनिक), ए. के. हुलजी (माजी सैनिक) ए. एल. मोहिते (आजी सैनिक) ए. टी. पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्राध्यापक, एनएनएस चे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. ए. कलजी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. टी. व्ही. सावंत यांनी तर आभार एनएसएस विभाग प्रमुख प्रा. ए. एम. दरेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment