नेसरी / सी. एल. वृत्तसेवा
युवा प्रतिष्ठान मराठा सांस्कृतिक मंडळ मौजे शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे रविवार दि १४ पासून दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतूल शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजया दशमीपर्यंत आयोजित केलेल्या भव्य अशा या दसरा महोत्सवामध्ये सलग ९ दिवस विविध कार्यक्रमांमुळे शिपूर येथे भारतिय संस्कृतिचा जयघोष होणार आहे. गडहिंग्लज विभागात सर्वात मोठा असा दसरा महोत्सव शिप्पूर येथे होत असतो.
रविवार दि १५ रोजी सायंकाळी दूर्गा मातेच्या मिरवणूकीनंतर मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. रोज आरती, रास दांडिया, रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, खुल्या हरिपाठ स्पर्धा अशा विविध स्पर्धा होणार आहेत. शुक्रवार दि. २० व २१ ऑक्टोबर रोजी खुल्या हरिपाठ स्पर्धा होणार आहेत. यासाठी अनुक्रमे १११११, ९००१, ७००१, ५५०१, ४००१, ३००१, २००१, १५०१, १००१ व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुलराजे शिखरे, उपाध्यक्ष विक्रम बोलके यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment