आमरोळी येथे ट्रॅव्हल्स व मोटरसायकल अपघातात एक ठार, एक महिला जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2023

आमरोळी येथे ट्रॅव्हल्स व मोटरसायकल अपघातात एक ठार, एक महिला जखमी

 

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

    आमरोळी (ता. चंदगड) येथे चंदगडहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने महागाव वरून हलकर्णी येथे जाणाऱ्या अशोक संतू पाटील (वय ५५, रा. हलकर्णी, ता. चंदगड) या दुचाकी स्वाराला जोराची धडक दिल्याने अशोक पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात  स्कूटी वरून प्रवास करणारी एक महिला गंभीर जखमी झाली. या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालक  विजय दत्तात्रय बोरणाक (रा. बामणे, ता. भुदरगड) यांच्या विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

     पोलीसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, आमरोळी येथे    चंदगड नेसरी रोडवरील आंबाजी नाईक यांच्याघरासमोर  सायंकाळी साडेपाच वाजता चंदगडहून मुंबईकडे जाणाऱ्या  ट्रॅव्हल्सने भरधाव वेगाने येऊन महागावहून हलकर्णीकडे जाणारी मोटर सायकल  व ॲक्टीव्हा या दोन दुचाकींना जोराची धडक दिली. यावेळी या मोटर सायकलवरील अशोक पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  अॅक्टीव्हा वरील महिला गंभीर जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.  

    घटनेची चंदगड पोलिसात फिर्याद आनंदा मारुती गुरव (रा. शिपूर ता गडहिंग्लज) यांनी चंदगड पोलिसात दिली असून ट्रॅव्हल  चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून तपास पो. उपनिरीक्षक सौ. धवीले करीत आहेत.


No comments:

Post a Comment