![]() |
राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते 'नेशन बिल्डर अवॉर्ड' स्वीकारताना के. जे. पाटील. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील प्राथमिक शिक्षक कल्लापा जोतीबा पाटील (के. जे. पाटील) यांना रोटरी क्लब कोल्हापूर मार्फत दिल्या जाणाऱ्या 'नेशन बिल्डर अवॉर्ड' ह्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मराठी विद्या मंदिर किटवाड या शाळेत कार्यरत असणारे के जे पाटील यांनी विद्यार्थी व शालेय गुणवत्ता वाढीसाठी राबविलेले विविध उपक्रम, चंदगड तालुक्यात 'तंबाखू मुक्त शाळा-गाव अभियान', कालकुंद्री गावात 'ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाची स्थापना' व वाचनचळवळ वाढीसाठी केलेले प्रयत्न आदी सामाजिक कार्याबरोबरच लेखक म्हणून त्यांचे प्रसिद्ध झालेले चार कथासंग्रह व एक कादंबरी अशा साहित्यिक योगदानाची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने रोटरी क्लब ने घेतली आहे.
पुरस्काराचे वितरण शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे जिप. कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोर्साडवाला व प्रेसिडंट संदीप शहापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
No comments:
Post a Comment