चंदगड येथील आरोग्य कर्मचारी संग्राम पाटील यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस, मरणोत्तर करणार अवयव दान - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2023

चंदगड येथील आरोग्य कर्मचारी संग्राम पाटील यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस, मरणोत्तर करणार अवयव दान

संग्राम अशोक पाटील

चंदगड / प्रतिनिधी 
       चंदगड येथील आरोग्य विभागात कार्यरत असलेले संग्राम अशोक पाटील (मुळ गाव गारगोटी जि. कोल्हापुर) यांनी आपल्या वाढदिवस मरणोत्तर अवयव व पेशी दान करण्याचा संकल्प केला.याबाबतचे सर्व कायदेशीर सोपस्कार केला आहेत. 
        प्रत्येकजण आपला जन्मदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत असतो. त्यातच मूळचे गारगोटी जिल्हा कोल्हापूर येथील व सध्या चंदगड येथे आरोग्य विभागामध्ये असणारे संग्राम अशोक पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून एक नवीन उपक्रम राबविला आहे. यामध्ये उपचारात्मक उद्देशाने मारणोत्तर शरीरातील नमूद केलेले अवयव आणि पेशी यांचे दान करण्याचे त्यांनी ठरवले आहे व त्याप्रमाणे अधिकृत त्यांनी सर्व प्रक्रिया करून ठेवली. अवयव दान श्रेष्ठ दान असे मनात ठेवून त्यांनी युवा वर्गा समोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. वाढदिवस म्हटले कि पार्टी व इतर गोष्टी आल्या त्याच सोबत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो असे जाणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.  इतरांनाही याचे महत्व त्यांनी पटवून देऊन अवयव दान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment