तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
गेले तीन सिझन तेलगू टायटन्स कडून कब्बडी प्रेा खेळणारा हूंदळेवाडी (ता. चंदगड) येथील सिध्दार्थ देसाई आता हरियाना स्टिलर्स कडून कब्बडी प्रो च्या १० व्या सिझन मध्ये खेळणार आहे. तब्बल १ कोटी रुपयाना सिध्दार्थ ला हरियाना स्टिलर्स ने घेतले आहे.
यावेळी बोलताना सिद्धार्थने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच हरियाना स्टिलर्स कडून खेळताना सर्वोत्तम खेळ खेळून ट्रॉफी जिंकणार असल्याचा विश्वासही सिध्दार्थने व्यक्त केला आहे. हे बोलताना मागील सिझनच्या तेलगू टायटनच्या सर्वांचे आभारही सिध्दार्थने मानले आहे. एकंदरीत पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या संघातून सिद्धार्थ देसाई खेळणार असून त्याचा खेळ पाहण्यासाठी चंदगडचे क्रीडा रसिक आसूसलेले आहेत.
No comments:
Post a Comment