तंटामुक्त कमिटी सदस्य निवडीनंतर अभिनंदन करताना. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
नांदवडे (ता. चंदगड) येथे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर महादेव पाटील यांची तर शेवाळे गाव उपाध्यक्षपदी माजी सैनिक नामदेव पाटील व नांदवडे गावातील उपाध्यक्षपदी संभाजी मळवीकर यांची निवड करण्यात आली. महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी नवीन गठीत करणे सभेचे अध्यक्षस्थान सरपंच राजेंद्र वैजू कांबळे यांनी भूषवले.
नांदवडे (ता. चंदगड) येथील ग्रुप ग्रामपंचायत नांदवडे-शेवाळे यांच्याकडून विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसेविका अश्विनी कुंभार यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून सभेला सुरुवात झाली. कमिटीचे काम व महत्त्व या विषयावर मार्गदर्शन झाल्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी प्रक्रियेला सुरुवात झाली. यामध्ये १९ गावातील इच्छुक उमेदवारांनी आपली नावे नोंदवली. १९ सदस्य मधून एक अध्यक्ष व शेवाळे गावासाठी एक वेगळा उपाध्यक्ष व नांदवडे गावासाठी एक उपाध्यक्ष देण्याची घोषणा करण्यात आली.
उपसरपंच एन. एस. पाटील यांनी मनोगतामध्ये तंटामुक्त कमिटी कशी असावी व त्यांनी सर्वसामान्य जनतेला योग्य न्याय देण्याचं काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. मावळते उपाध्यक्ष दयानंद गावडे यांनी सुद्धा आपण योग्य तो न्याय निवाडा करावा आम्ही कायम कमिटीच्या सोबत आहोत अशी भूमिका मांडली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी गावात राहून जास्तीत जास्त वेळ देत योग्य न्याय निवाडा करू असे अभिवचन आपल्या मनोगतातून दिले.
सभेला ग्राप सदस्य विद्यानंद सुतार, सदस्या सौ. संगीता गावडे, सौ. अस्मिता पाटील, सौ. संजीवनी सुतार सौ. संजीवनी पेडणेकर, सौ. अश्विनी गावडे, संपत पेडणेकर, विजय कुंदेकर, पोलीस पाटील विष्णू सुतार, शंकर पाटील, जी. जी. पाटील, परशराम पवार, विठोबा कुट्रे, गणपती शिंदे सर्व नवनिर्वाचित तंटामुक्त कमिटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सदस्य परसराश फडके यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment