रामपूर येथे दर शुक्रवारी आठवडा बाजाराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2023

रामपूर येथे दर शुक्रवारी आठवडा बाजाराचे आयोजन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील रामपूर येथे दर शुक्रवारी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले असून ६ ऑक्टोबर पासून या बाजाराची सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी दमदार पद्धतीने बाजार भरला असून पुढील आठवड्यात या बाजारची व्याप्ती वाढणार असून भाजीपाला व्यापारी, कापड व्यापारी, किरकोळ मालाचे दुकानदार, त्याच बरोबर  कोंबड्या बकऱ्याचे बाजार या ठिकाणी भरवला जात आहे. 

       ग्रामपंचायत रामपूर व सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने या बाजाराचे आयोजन करण्यात आले असून शिस्तबद्ध रित्या दुकान थाटण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवाय पार्किंगची स्वतंत्र  व्यवस्था करण्यात आली असून कोंबड्या बकऱ्याचे बाजार स्वतंत्र भरवण्यात येत आहेत. व्यापाऱ्याने या ठिकाणी आपली दुकाने थाटून या बाजारला प्रचंड प्रतिसाद द्यावा अशी मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कडून होत आहे. जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते बाबुराव वर्पे यांनी व्यापाऱ्यांना पत्रक काढून बाजारात येण्यासाठी आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment