मोहन उर्फ विलास कलाप्पा रेडेकर |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मूळचा कुदनूर, विद्यानगर (ता. चंदगड) येथील व सध्या समतानगर, कांदिवली, मुंबई येथील रहिवासी असलेला तरुण मोहन उर्फ विलास कलाप्पा रेडेकर (वय 32) याचा अपघातात मृत्यू झाला.
मुंबई ते नाशिक ते शिर्डी या मार्गावरून ते शिर्डी दर्शनाला आपल्या मित्रांसमवेत कारमधून निघाले होते. मात्र गुरुवारी पहाटे 3.35 वाजता शहापूर तालुक्यातील कसारा घाटात साईबाबा खिंड मध्ये एका वळणावर त्यांची कार रस्त्याकडेला जाऊन पलटी झाली. यात मोहन उर्फ विलास याचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये पाच जण होते. त्यापैकी अन्य तिघे किरकोळ जखमी झाले मात्र एक जण पूर्णपणे सुखरूप आहे.
मोहन उर्फ विलास याच्या पश्चात वडील, एक विवाहित तर एक अविवाहित अशा दोन बहिणी आहेत. शुक्रवारी रात्री आठ वाजता दौलतनगर, बोरिवली ईस्ट या ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद शहापूर तालुक्यातील कसारा पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे. या घटनेने कुदनुर गावावर शोककळा पसरली आहे. मोहन उर्फ विलास हा मुंबई येथे एका चार्टर्ड अकाउंटंटकडे सहाय्यक म्हणून कार्यरत होता. त्याचे वडील एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. करता तरुण अचानक निघून गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातातील अन्य तिघा जणांची प्रकृती चांगली आहे.
No comments:
Post a Comment