गवसे येथील श्री पावणाईदेवी सेवा संस्था सभासदांना १३ टक्के लाभांश देणार, वार्षिक सर्वसाधारण सभेत माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

07 October 2023

गवसे येथील श्री पावणाईदेवी सेवा संस्था सभासदांना १३ टक्के लाभांश देणार, वार्षिक सर्वसाधारण सभेत माहिती

 

गवसे येथील सेवा संस्थेच्या सभेत बोलतानाि चेअरमन श्री. सय्यद, समोर उपस्थित सभासद.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        गवसे येथील श्री पावणाई देवी सेवा संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन अल्लीसाब फकरू सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमुळे संपन्न झाली. अहवाल सालात संस्थेला ७ लाख ३० हजार २२३ रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेने सभासदांना ठेवीवरील व्याजमध्ये ७ टक्के व शेअर्स रकमेवर ६ टक्के असा एकत्रित १३ टक्के लाभांश देण्याचे ठरवले आहे.

        संदीप नाईक यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन सचिव किशोर देसाई यांनी केले. यावेळी चर्चेत धनंजय नेवगे, महादेव सावंत, रमेश नेवगे, राजेंद्र भोसले, संतोष पाटील, मोहन इलगे इत्यादी सभासदांनी सहभाग घेतला. प्रथमच महिला सभासद ही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

        यावेळी संचालक हनुमंत गुरव, अर्जुन देवळी, बाळू पाटील, आप्पाजी पाटील, रामचंद्र नांदवडेकर, केशव इलगे, सखाराम कांबळे, लक्ष्मण गिरी, संचालिका मंगल नेवगे, रुक्मिणी पेडणेकर, शिपाई अशोक कांबळे व संस्थेचे सभासद उपस्थित होते. व्हाईस चेअरमन विजय कांबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment